मंत्री छगन भुजबळ म्हणाले राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली, केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले. महात्मा फुले योजना, विदर्भ, सोलापूर, लातूर भागातील महापूर यातून कोट्यवधी रुपये खर्च झाला तरी कोरोनाच्या काळात सरकारने आरोग्याला प्राधान्य दिले.

राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील. प्रसंगी कर्ज काढा म्हणून विधानसभेत मागणी केली आहे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यलायात गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठक प्रसंगी ते बोलत होते.

आमदार आशुतोष काळे, मुख्य अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, काळे कारखाना व्हाईस चेअरमन रोहोम, माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे ,डॉ अजय गर्जे, उपस्थित होते.

दरम्यान पाणी प्रश्नावर बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले कि, सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या व गुजरातकडे समुद्राला वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर राज्याचा हक्क आहे. 100 ते 125 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले तर भविष्यात जिल्ह्या-जिल्ह्यातील भांडणे मिटतील.

चालू वर्षी धरण परिसरात कमी पाऊस पडला असून पाण्याचे बाष्पीभवन, गळती व अन्य कारणाने पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याचे सांगून रब्बी खरीपमध्ये तीन आवर्तने सोडण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली. आमदार आशुतोष काळे यावेळी म्हणाले,

गोदावरी खोऱ्याचा पाणी प्रश्न बिकट होत असून पश्चिमेच्या पाणी वळवणे किती गरजेचे आहे, हे आता लक्षात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी यात विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. आवर्तन सोडण्याआधी चाऱ्या दुरुस्ती करावी. अशी मागणी काळे यांनी यावेळी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment