Suzuki Access 125 : भारतीय दुचाकी बाजारात स्कूटरला मोठी मागणी आहे. बाईकच्या तुलनेत स्कूटर चालवायला सोपी, आरामदायी आणि शहरातील रहदारीसाठी अधिक उपयुक्त असल्याने ग्राहकांचा कल स्कूटरकडे वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर सुजुकी मोटरसायकल इंडियाने आपल्या लोकप्रिय Suzuki Access 125 स्कूटरला नव्या अपडेटसह सादर केले आहे. या अपडेटमुळे स्कूटर अधिक सुरक्षित, आधुनिक आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार बनली आहे.

Suzuki Access 125 मध्ये आता प्रथमच ABS (Anti-lock Braking System) देण्यात आले आहे. हे फीचर अचानक ब्रेक लावताना चाकं लॉक होऊ देत नाही आणि स्कूटरचा ताबा रायडरकडे ठेवते.
त्यामुळे ओल्या रस्त्यावर किंवा आपत्कालीन परिस्थितीत ब्रेकिंग अधिक सुरक्षित ठरते. कंपनीच्या मते, या अपडेटमुळे रायडर्सचा एकूणच प्रवास अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित होणार आहे.
सुजुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक केनिची उमेडा यांनी सांगितले की, “ABSसह सुसज्ज Suzuki Access सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे Access कुटुंबातील पर्यायांची व्याप्ती वाढली असून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य स्कूटर निवडणे अधिक सोपे होईल.”
इंजिनच्या बाबतीत Suzuki Access 125 मध्ये 124 cc क्षमतेचे फ्यूल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6.2 kW पॉवर आणि 10.2 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये CVT ट्रान्समिशन देण्यात आले असून, स्मूथ आणि आरामदायी रायडिंगचा अनुभव मिळतो. मायलेज आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम समतोल या स्कूटरमध्ये पाहायला मिळतो.
फीचर्सबाबत बोलायचे झाले तर, या स्कूटरमध्ये 12 इंच टायर्स, फ्रंट डिस्क ब्रेक, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट, 160 mm ग्राउंड क्लिअरन्स, 24.4 लिटर अंडरसीट बूट स्पेस आणि LED हेडलाइट्स देण्यात आले आहेत. Ride Connect आणि TFT डिस्प्ले मुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभवही ग्राहकांना मिळतो.
किंमतीच्या बाबतीत, Suzuki Access 125 चे दोन नवे व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. Access Ride Connect ABS Edition ची एक्स-शोरूम किंमत 92,328 रुपये असून, Access Ride Connect TFT ABS Edition ची एक्स-शोरूम किंमत 98,378 रुपये आहे. सुरक्षितता, फीचर्स आणि विश्वासार्हतेचा विचार करता, ही स्कूटर मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.













