अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- ‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लायकीची माणसे नाहीत त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना पळवले,’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘वंचित’च्या तिकिटावर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपूर येथून ‘वंचित’च्या तिकिटावर विधानसभा लढवलेले अनिरुद्ध वनकर यांची नावे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवली.
अनलॉक ४ ची नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली. त्यात त्यांनी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारचे ऐकायचेच नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मॉल, मदिरा सुरू केले आहे. तेथून कोरोना पसरत नाही आणि मंदिरे उघडली तर कोरोना कसा होईल,
असा प्रश्न त्यांनी विचारला. आचार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आचार्य उपमुख्यमंत्री व आचार्य बाळासाहेब थोरात असा उपरोधिक नामोल्लेख करून या आचार्यांना हरिभक्त पारायण मंडळींची अॅलर्जी झाल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved