जिल्ह्यातील नादुरुस्त रस्ते अपघातास मृत्यूस कारणीभूत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे.

याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे. खड्डे, नादुरुस्त रस्ते, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां या सध्या चांगल्याच गाजत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व होणे अपेक्षित असून मात्र मान्सून परतला देखील तरी रस्त्यांची दुर्दशा कायम आहे.

यातच बाभळेश्वर ते श्रीरामपूर रोडवर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले असल्यामुळे या रोडवरून जाणारे येणार्‍या दुचाकी-चारचाकी वाहनांतून प्रवास करणार्‍या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातच खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात घडत असून

यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आह तर अनेक दुचाकीस्वार जखमी होत आहे. या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहेत. या रस्त्यांवरून उसाची वाहतूक करणार्‍या ट्रक चालक, बैलगाडी, ट्रॅक्टर चालक या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

याची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन खड्ड्यांवर डांबरीकरण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे,

अशी मागणी जोर धरू लागली असून हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजवल्यास कोणतीही सूचना न देता बाभळेश्वर चौकात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News