अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्ती साठी पावणेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही सदरचे काम निकृष्ट दर्जाचे व संथगतीने सुरू आहे.
मात्र संबधित कंपनी व ठेकेदार लक्ष देत नाहीत. त्यामुळे चांगले काम झाले नाही तर लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी आमदार रोहित पवार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. खर्डा किल्ला सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून चार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
त्यातून किल्याच्या विकासात व गावच्या वैभवात भर पडत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो आहे. महाराष्ट्र सरकारने खर्डा किल्ल्याची भव्य शिवस्मारक उभारणीसाठी दखल घेतली ही बाब खर्डाकरांसाठी अभिमानाची व आनंदाची असल्याची खर्डा करांची भावना आहे. प्राप्त निधीमार्फत तीन वर्षापासून किल्याचे दुरूस्तीचे काम चालु आहे.
सदरील काम कधी चालु तर कधी बंद असल्यामुळे तेथे मनमानी कारभार चालु आहे.या बाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी आवाज उठवला आहे. हे काम मुंबई येथील एका कंट्रक्शन कंपनीला मिळाले असुन संबंधित ठेकेदाराकडे कोणत्याही प्रकारचे कुशल कारागीर नसुन पुरात्व खात्याने या कंपनीला ज्या अटी शर्त घालुन दिल्या आहेत त्याचे पालन केले जात नसुन
संबधित शासकीय आधिकारी सदरील कामामध्ये जाणीव पुर्वक दुर्लक्ष व हलगर्जीपणा करीत आहेत. या बाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी खर्डा किल्ल्यावरती वेळोवेळी गेले असता तेथील कामाचा दर्जा वापरले जाणारे साहित्य व काम करण्याची पध्दत अतिशय चुकीची व निकृष्ट पध्दतीने काम चालु आहे.
तसेच कामाचे बजेट वाढावे म्हणुन कामात जाणीवपुर्वक दिरगांई केली जात आहे व ठरलेल्या वेळेमध्ये काम पुर्ण केले जात नाही, तरी किल्ल्याचे काम तातडीने चालू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी आमदार रोहित पवार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved