अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नोटाबंदी जाहीर झाली त्याला रविवारी चार वर्षे पूर्ण झाली. यामुळे काळा पैसा कमी झाला, रोखता वाढली आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
तर, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप करून हा विश्वासघाती दिवस असल्याची टीका केली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधान मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा अचानक बंद केल्या होत्या.
यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. देशभर लगेच एटीएमच्या बाहेर रांगा लागल्या. कित्येक दिवस हजारो लोक अस्वस्थ होते. कामे सोडून लोक बँकांमध्ये रांगा लावून उभे होते.
मोदींनी सोशल मीडियावर या नोटाबंदीमुळे झालेले लाभ रविवारी सांगितले. जीडीपी वाढला, डिजिटल व्यवहार वाढले, राष्ट्रीय सुरक्षा भक्कम झाल्याचे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved