सोनई :- पुत्र प्रेमापोटी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झाले आहेत.त्यांची ही धृतराष्ट्रनीती झुगारून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
सोनई येथील आदर्श विद्यालयाच्या मैदानावर मुरकुटे यांच्या विकास दिंडीची सांगता झाली.त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

शैनेश्वर देवस्थानाचे विश्वस्त बापूसाहेब शेटे अध्यक्षस्थानी होते. भाऊसाहेब पटारे,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,दत्तात्रय लोहकरे,अंबादास कोरडे, डॉ.वैभव शेटे, बाळासाहेब बानकर, सरपंच आप्पासाहेब शिंदे,अंकुश काळे ,
पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे,दादासाहेब कोकणे, ज्ञानेश्वर पेचे,दत्तात्रय लोहकरे, प्रफुल जाधव, बाबासाहेब कांगुणे,कृष्णा परदेशी आदी उपस्थित होते. सभे आगोदर सोनई शहरातून विकास दिंडी रॅली काढण्यात आली.
आ.मुरकुटे पुढे म्हणाले, आमदारकीची पुन्हा संधी मिळाली,तर पहिला निर्णय सोनईला नगरपंचायत करण्याचा असेल. गडाखांनी 50 वर्षात तालुक्यात काय दिवे लावले याचे आत्मपरीक्षण करावे.
त्यांना तालुक्यातील झालेला विकास दिसत नाही मग त्यांना आंधळे नाही तर काय म्हणायचे असा सवाल करत अनेक संस्था असताना आपण विकास कामातून ताकत दाखवावी असा टोला त्यांनी लगावला.
विकासदिंडीला गडाखांच्या मायभुमीत क्रांतिकारीच्या युवकांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे सांगत गडाखांना चांगले करता येत नाही तर वाईट करण्याचे पाप ही त्यांनी करू नये.
पुत्रप्रेमापोटी जेष्ठ नेते ध्रुतराष्टाप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधल्याचे सोंग आणत दिशाभूल करत असून ही निती झुगारुन लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साथ द्या.
“असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी करत पाच वर्षात केलेल्या विकास कामाची माहिती दिली.
- Tata च्या ‘या’ शेअर्सने 30 दिवसात गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! मिळालेत 60% रिटर्न, आता Stock Split ची मोठी घोषणा
- ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !
- शेअर मार्केटमधील ‘ही’ आयटी कंपनी देणार 5.75 रुपयांचा Dividend ! रेकॉर्ड डेट कोणती?
- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पण वाढला! वाचा डिटेल्स
- ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! 100x झूम आणि 50 MP कॅमेरा असणारा ‘हा’ विवोचा स्मार्टफोन 10,000 रुपये स्वस्तात मिळणार