अहमदनगरमध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि 2 ते 50 % सूटही; ‘खरेदिवाला’तर्फे ऑफर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-सध्या दिवाळीच्या किराणा सामानासह सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी नगरकरांची लगबग सुरू आहे. अशावेळी लोकरंग कॉर्पोरेशन संचालित ‘खरेदिवाला मेगामार्ट’तर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर झालेली आहे.

यामध्ये किराणा सामानाची यादी फ्री होम डिलिव्हरीसह ग्राहकांना तब्बल 2 ते 50 टक्के इतकी भरघोस सूट मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना संचालिका माधुरी चोभे यांनी सांगितले की, कमाल विक्री मूल्य (एमआरपी MRP) यावरही आम्ही किमान 2 टक्के सूट देत आहोत. अगदी बिस्किटांसह सर्वच पॅकिंग मालावरही ही सूट आहे.

त्यासाठी ग्राहकांनी आपली किराणा यादी 9551915050 या मोबाईल नंबरच्या व्हाटस्अॅपवर पाठवून दिल्यास पुढील 4-5 तासात त्यांना थेट घरामध्ये किराणा पोहोच केला जाईल. त्यावर डिलिव्हरीसाठी कोणतेही सेवाशुल्क नसेल. किमान 2 टक्के म्हणजे फ़क़्त इतकेच नाही,

तर मसाले उत्पादनांवर 5 ते 15 आणि गोवर्धन गुलाबजामून यांच्या पाकीटासह इतर काही वस्तूंवर तर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते. ही ऑफर सर्वांसाठी खुली आहे.

ग्राहकांनी त्यासाठी आपली यादी आणि मालाचा प्रकार याची स्पष्ट माहिती लिहून 9551915050 या मोबाईलवर यादी पाठवून द्यावी. त्यांना घरपोहोच किराणा सेवा दिली जाईल, अशी माहिती माधुरी चोभे यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment