आग्रा: नवीन मोटार वाहन नियमाच्या दंडाच्या रक्कमेची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. आग्रा शहरातील एका दांम्पत्याने अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून त्याला चक्क खोलीत कोंडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घरी येऊन मुलाची सुटका केली आहे.
आग्य्रातील एतमादुद्दौलाच्या शाहदरा परिसरातील धरम सिंह यांनी १२ ऑगस्टला एक नवीन गाडी खरेदी केली होती. त्याचा १६ वर्षीय मुलगा सतत गाडी चालवत होता. मात्र, १ सप्टेंबरपासून सरकारने वाहतून दंडाचे नवीन नियम लागू केले. त्यानंतर वडिलाने मुलाला गाडी देण्यास नकार दिला.
मात्र, मुलगा गाडीसाठी हट्ट करत असल्याने आई-वडिलांनी त्याला खोली बंद केले. दरम्यान, अल्पवयीन मुलाला गाडी चालवताना पकडल्यास नवीन नियमानुसार २५ हजार रूपये दंड असल्याने वडिलांनी मुलाला खोलीत बंद केले होते.
मुलाने आपली सुटका करण्यासाठी थेट पोलिसांना फोन केला. पोलिस आपल्या घरी अचानक आल्याने मुलाचे आई-वडिलही हैराण झाले. त्यांनी मुलाची खोलीतून सुटका केली आणि मुलाला गाडी न चालवण्यासाठी वडिलाचे ऐकण्याचा सल्ला दिला.
‘आम्ही कुटूंबियांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय मुलाला आपल्या आई-वडिलांचे ऐकण्यास सांगितले आहे’, असे एसएसओ उदयवीर सिंह मलिक म्हणाले.’ आग्रा आरटीओ अनिल कुमार म्हणाले की, उत्तर प्रदेशात अजूनही नवीन नियम लागू झालेेले नाही. आताही जुन्याच कायद्यातर्गंत चालन कापले जात आहे.
- आयटीआर फाईल कराल तर मिळतील चकित करणारे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल
- भारतीय रिझर्व बँकेचा मोठा निर्णय ! ‘ही’ बँक खाती बंद होणार, तुमचे खाते लिस्टमध्ये आहे का?
- होमलोनचा हप्ता थकल्यावर लगेच होते का मालमत्तेची जप्ती? कशी असते बँकेची प्रक्रिया?
- पोस्टाची ‘ही’ योजना 2 वर्षात तुमच्या पत्नीला बनवेल श्रीमंत! व्याजाने जमा होईल भरपूर पैसा
- सोने घरात किती ठेवता येत ? तुम्हाला सरकारचे हे नियम माहित आहेत का ?