अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बाजारातील परिस्थितीनुसार सोने – चांदीच्या भावामध्ये दरदिवशी चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढतच आहे.
यातच दिवाळी तोंडावर आली असतानाच सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आज सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात झळाळी पाहायला मिळाली.
एचडीएफसी सिक्योरिटीजद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी (दि. 9) सोन्याच्या दरात 277 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. तसेच दुसरीकडे 650 रुपये प्रति किलोग्रॅमने चांदीचे दरही वधारले आहेत.
अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या निवडीने आणि प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेमुळे, दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 277 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्यामुळे, सोन्याचा दर 52,183 रुपयांवर पोहचला आहे.
याआधी शुक्रवारी, सोन्याचा दर 51 हजारांच्या घरात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1960 रुपये प्रति औंस होता.
तसेच दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 650 रुपये प्रति किलोने वाढून 65,699 रुपये इतका झाला आहे.शुक्रवारी चांदीचा भाव 65,005 रुपये इतका होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 25.75 डॉलर प्रति औंस होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved