अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला आहे. गेले अनेक दिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरु होते, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु होता.
मात्र आता पुन्हा एकदा कांद्याचे दर वधारले असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मागील आठवड्यात चार हजार रुपयांपर्यंत खाली आलेले कांद्याच्या भाव पुन्हा वधारले असून सोमवारी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 7 हजार रुपय क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे.
5 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव मिळाला होता. कांद्याचे भाव कमी होत असल्याने आवकही कमी होऊ लागली. त्यामुळे 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये केवळ साडेसहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याची आवक कमी होत असल्याचे लक्षात येताच व्यापार्यांनी भाव वाढवले.
परिणामी सोमवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात प्रथम प्रथम वारीच्या कांद्याला 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शिवाय 15 हजार 615 क्विंटल आवकही झाली. लाल कांद्यालाही साडेतीन हजारांपर्यंत भाव असून सोमवारी 1276 क्विंटल आवक झाली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved