शेअर बाजारात उसळी, गुंतवणूकदारांनी कमावले ‘एवढे’ कोटी रुपये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-देशभरात आज बिहार निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर जो बायडन यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी बघावयास मिळाली.

त्याचा फायदा भारतामध्येही झाला. दरम्यान आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही शेअर बाजाराला नवीन उच्चांकासह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 361.82 अंकांच्या वाढीसह 42,959.25 च्या उच्चांकावर उघडला. याचबरोबर निफ्टीने पहिल्यांदाच 12,500 पार केले आहेत.

अमेरिकन निवडणुकीत जो बायाडन यांचा विजय आणि कोरोना लसीविषयी होणाऱ्या दाव्यांमुळे शेअर बाजाराला मोठी चालना मिळाली आहे. सलग सातव्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांनी 8.80 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, सोमवारी भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारल्याचे समोर आले होते. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजार (BSE) 704 अंकांच्या तेजीसह 42,597 अंकावर स्थिरावला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 197 अंकांच्या उसळीसह 12461 अंकावर स्थिरावला होता.

गेल्या आठ दिवसात कोट्यवधींची उलाढाल 2 नोव्हेंबरला बीएसईवर एकूण कंपन्यांची मार्केट कॅप 1,57,18,574.96 कोटी रुपये होती, जी 10 नोव्हेंबरला 8,78,858.6 कोटी रुपयांनी वाढून 1,65,97,433.56 कोटी रुपये झाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment