नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएमला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा तोटा वाढून १६५ टक्के झाला होता. याचा अर्थ दररोज कंपनीला ११ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा स्वीकारावा लागला.
या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढही झाली.डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पेटीएमला गुगलपे व फोनपे यांच्याशी मोठा तीव्र संघर्ष करावा लागला. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ३९५९.६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.

कंपनीने ही आकडेवारी आपल्या शेअर होल्डर्सनाही दिली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीचे उत्पन्न ३३१९ कोटी रुपये होते व त्यापूर्वीच्या वर्षात म्हणजे २०१७-१८ मध्ये ते ३२२९ कोटी रुपये इतके होते.
कन्सॉलिडेटेड महसूल ४२१७ कोटी रुपये होता. यामध्ये पेटीएम मनी फॉर म्युच्युअल फंड इनव्हेस्टमेंट, पेटीएम फायनान्शियल स्व्हिहसेस, पेटीएम एंटरटेन्मेंट स्व्हिहसेस व अन्य उप कंपन्याही समाविष्ट आहेत.
- भारताच्या शेजारी असलेल्या ह्या देशात चिकन खाणं म्हणजे श्रीमंतांची मजा ! किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…
- विराट कोहलीची पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये एंट्री होणार ! भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण
- कमी पैशांत आरामदायी जीवन जगायचं असेल तर हे 10 देश बघा
- श्रीरामपुरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, माजी आमदारासह उबाठा गटाचा ‘हा’ नेता करणार आज शिंदेसेनेत जाहीर प्रवेश
- 2025 मध्ये तिसरे महायुद्ध ? होणार मानव जातीच्या नाशाला सुरुवात ? पहा बाबा वेंगाचे धक्कादायक भविष्यवाणी