दिल्ली :- खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपस्थित नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पुण्यातील विमानतळावरून उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाले होते.

महाजनादेश यात्रेवर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदयनराजे भोसले यांना घेण्यासाठी पुणे विमातळावर पोहोचले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजेंच्या या भेटीच्या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचीही उपस्थिती होती.
साताऱ्यात आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. विधानसभेबरोबरच ही निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता आहे. खरंतर सातारा हा राष्ट्रवादीचा गड आहे. मात्र येथील राष्ट्रवादीचा कर्ताधर्ताच भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला आपला गड राखणे मोठे आव्हान आहे.
यापूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसंच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हेदेखील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.
खरंतर उदयनराजेंनी गुरुवारी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतचं राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केला होता. मात्र या भेटीनंतर अवघ्या काही तासातचं उदयनराजेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
- शनी, मंगळ, शुक्र ग्रहाच्या बदलत्या चालेमुळे घडणार चमत्कार; श्रावण महिन्यात 4 राशींवर पडणार पैशांचा पाऊस!
- भारताच्या शुभांशू शुक्लाने अंतराळातून टिपला पृथ्वीचा अद्भुत नजारा, पाहा फोटो!
- पावसाळ्यात चेहरा चिकट पडतोय, पिंपल्सनेही त्रास दिलाय? जाणून घ्या बेस्ट स्किनकेअर टिप्स!
- मित्रांच्या बहीणींवरच जडलं प्रेम…, ‘या’ 5 क्रिकेटपटूंनी टीममेटच्या बहीणींशीच थाटला संसार! वाचा त्यांच्या भन्नाट लव्ह स्टोरीज
- शेतकऱ्यांनो PM किसानचे ₹2000 रुपये पाहिजे असतील, तर आत्ताच ‘ही’ कामे करून घ्या! अन्यथा खात्यात 20 वा हप्ता जमा होणार नाही