हॉटेल लॉजिंगमध्ये मुक्काम करून ऑनलाईन फसविले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- आनंदऋषी ‘हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल आयरिश येथे पुण्याचे चोघे तरुण हॉटेल लॉजमध्ये मुक्कामी थांबले.

हॉटेल लॉर्जिंगचे बिल देण्यासाठी चौघा आरोपींनी जातांना हॉटेलच्या काउंटरवर ऑनलाईन पेसे अकाऊंटवर पाठविल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक करून लॉर्जिंग हॉटेलचे पैसे न देताच निघुन गेले.

याप्रकरणी हॉटेल मॅनेजर दिपीक सुनील विधाते, (रा. तपोवन रोड, नगर) यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी संजय अशोक सोनार, (रा. भोसरी पुणे,) राजू हिरालाल गुप्ता (रा. कुंढवा उत्तरप्रदेश) शुभम सोनवणे, रवी पटेल, दोघे रा, माहिती नाही.

या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पटारे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe