अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अनेक नेत्यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून, अनेकजण संपर्कात आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसची ताकद वाढण्यास त्यामुळे मदत होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले कि, काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून, हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत लवकरच तेही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
दरम्यान गांधी भवन (औंध. जि. सातारा) येथे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved