चंद्रपूर : दामदुप्पटीचे आमिष दाखवून राज्यभरात गुंतवणूकदारांकडून लाखोंच्या रकमा गोळा करून मैत्र कंपनीने हात गुंडाळले आहे.
या कंपनीत जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे तब्बल अडीचशे कोटी रुपये अडून असून, ही रक्कम ग्राहक, अभिकर्ता यांना परत मिळावी यासाठी अभिकर्ता, गुंतवणूकदार १९ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात महामोर्चा काढणार आहे.

यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार असल्याची माहिती सिद्धार्थ जगताप व अन्य अभिकर्त्यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
मैत्रने राज्यभरात शाखा उघडून अभिकर्त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. दामदुपट्टीचे गुंतवणूकदारांना तर अभिकर्त्यांना आकर्षक कमिशनचे आमिष दाखविण्यात आले. काही वर्ष कंपनीचा व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र, ४ फेब्रुवारी २०१६ पासून कंपनीने सर्वच कार्यालये बंद करून गाशा गुंडाळला.
- खुशखबर ! मुंबईवरून धावणाऱ्या 2 एक्सप्रेस गाड्यांना राज्यातील ‘या’ Railway स्थानकावर थांबा मंजूर
- पोस्ट ऑफिसची श्रीमंत बनवणारी योजना ! दररोज 50 रुपये गुंतवा आणि तब्बल 35 लाखांचे मालक बना !
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! 18 मे पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
- घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय ? मग 10 रुपयांचा ‘हा’ पदार्थ घरात ठेवा, उंदरांचा 100% बंदोबस्त होणार
- इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचय ? ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस !