भाजपा युवा मोर्चाच्या दक्षिण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी भाजप युवा मोर्चाच्या नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली असून यात दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी कदम पाटील, उपाध्यक्षपदी शिवाजी बेरड, अमोल सदाशिव शेलार, तुषार अनिल पवार, उमेश वसंतराव भालसिंग, महेंद्र नारायण तांबे, धनंजय नारायण मोरे, अमोल अशोक गर्जे, संजय रामचंद्र कार्ले यांची निवड करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी अक्षय शिवाजीराव कर्डिले व गणेश बबन कराड यांची, चिटणीसपदी अनिल मारुती गदाद, उदय तुषार पवार, सचिन बाबासाहेब पालवे, राजकुमार भानुदास लोखंडे, दत्तप्रसाद राजेंद्र मुंदडा, अभिजित रोहकले, मछिंद्र अंकुश बर्वे, अभिजित रामचंद्र जवादे यांचीच निवड करण्यात आलेली आहे.

प्रसिद्धी प्रमुख म्हणून राहुल संभाजी लांडे, खजिनदारपदी विवेक भानुदास बेरड तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश अशोक झावरे, भाऊसाहेब निवृत्ती खुळे, प्रभाकर सोपान जाधव, विकास संभाजी काळे, सागर बाळासाहेब कल्हापुरे, निलेशकुमार साहेबराव दरेकर, योगेश आदिनाथ कासार, संजय भाऊसाहेब कदम,

ईश्वर दादासाहेब मुरुमकर, हरिभाऊ मछिंद्र वायकर, विक्रमसिह शिवाजीराव जाधव, सोमनाथ वाखारे, गोपिनाथ जगताप, अमोल बावडकर, उदय लक्ष्मण शिंदे, सोमनाथ विष्णूपंत अकोलकर, राहुल केशरचंद बंब, पांडुरंग नामदेव मोरे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी या कार्यकारिणीला स्थगिती दिली होती.

यापूर्वीच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत काही बदल करून आता 2 सरचिटणीस, 4 चिटणीस, 8 उपाध्यक्षांसह दक्षिणतेतील सर्व तालुक्यांतील कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment