अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
बगाटेंची बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थानची सुत्रे कोणाच्या हातात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच या महत्वाच्या पदावर शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना वरील मागणीचे निवेदन पाठविले आहेत.
बगाटे यांची बदली झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष व आयएसआय अधिकारी असायला हवा व राज्य शासनाने अशा
अधिकाऱ्यांची श्री साईबाबा संस्थान वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी साईभक्त व शिर्डीकर यांच्यासह नागरिकांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
यातच नियमबाह्य कामावर अंकुश ठेवणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे मुंढे यांची शिर्डी साईबाबा विश्वस्त व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यास देवस्थानचा आदर्श इतर देवस्थान घेतील.
देवस्थानची खर्चाची होणारी उधळपत्ती थांबून विधायक कार्याला गती मिळेल. इतर खर्चाला फाटा देऊन देवस्थानच्या तिजोरीत मोठी भर पडेल. तसेच मुंडे यांची नियुक्ती झाल्यास संस्थांना चांगले दिवस येणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved