८ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Published on -

पारनेर: तालुक्यातील सुपा येथील जि.प. प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय शाळकरी मुलीवर प्रमोद मच्छिंद्र कदम, वय ३८ रा.सुपा याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र परिसरातील नागरिक व महिलांच्या लक्षात ही बाब आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना दि.१३ रोजी घडली.

याबाबत सविस्तर असे की, कदम याने तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुरडीस येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याच्या बाजूस पळवून नेवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत असताना परिसरातील परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा मुलीवर अत्याचाराची गंभीर घटना टळली.

याप्रकरणी सुपा पोलिसांनी पोक्सो काद्याप्रमाणे जि.प. प्रा. शाळा मुख्याध्यापिका नंदा आल्हाट यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News