सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार – पालकमंत्री राम शिंदे

Ahmednagarlive24
Published:

कर्जत : तालुक्यात सुतगिरणी उभारण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील कुळधरण गणातील रुईगव्हाण येथे झालेल्या बैठकीत ना. शिंदे बोलत होते. ना. शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात केेलेल्या विकास कामांचा आढावाच सादर केला. ना. शिंदे यांनी विरोधकांवर चौफेर टिका केली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-आघाडीच्या सरकारनेच शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने वाटोळे केले. आघाडीच्या कारकिर्दीत मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भरीव कामे झाली.

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने भाजपानेच न्याय दिला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने सक्षम नेतृत्व मिळाले आहे. जम्मू काश्मिर मधील 370 कलम हटवून भाजप सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला.

देशाला नरेंद्र मोदी व राज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाची खरी गरज आहे. लोकसभेत ज्या प्रमाणे आघाडीचा धुव्वा उडाला त्याच प्रमाणे विधानसभेतही आघाडीचे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम दावा त्यांनी केला.

कर्जत-जामखेडचे विरोधी संभाव्य उमेदवार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. निवडणुक काळातच ते मतदार संघात फिरता आहेत. निवडणूक संपली की ते मतदार संघातून गायब होतील अशी टिका त्यांनी केली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment