बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा– अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर मुख्यमंर्त्यांचे तेरा मिनिटांचे भाषण झाले.

या भाषणानंतर मुख्यमंत्री जनादेश यात्रेतील रथातून उतरून जात असताना काही अंतरावर असलेल्या युवकांनी एकच वादा… अजितदादा… अशा घोषणा दिल्या. या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार केला.
यानंतर घोषणाबाजी करणारे युवक पळाले. यातील काही युवकांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ युवकांनी ठाण मांडून घोषणाबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंर्त्यांच्या जनादेश यात्रेत धनगर आरक्षण प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अगोदरच पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या कार्यकर्त्यांना एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
- महाराष्ट्र राज्य शासन ‘या’ गावांमधील नागरिकांना वाटणार 5,000 कोटी ! प्रत्येकजण होणार करोडपती, कसा आहे नवा प्रकल्प?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! PM मोदी 3 Vande Bharat ला दाखवणार हिरवा झेंडा, कसे असणार रूट?
- सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आता एक तोळा सोने खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक साडेसात हजार रुपये
- गुड न्यूज ! आजपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, तिरुपतीला जाणे होणार सोपे, राज्यातील ‘या’ आठ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा













