तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच काल बिबट्याने संगमनेर तालुक्यात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा युवक जखमी झाला होता. ही घटना संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे घडली होती. तरुणावर हल्ला केल्याने वन खात्याने पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे ही बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.

आंबी दुमाला येथे सावकार शिंदे यांच्या शेतीत वाट्याने करण्यात आलेल्या कांद्याच्या रोपाला अनिल मधे पाणी भरत होते. याठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर अचानक हल्ला करत खाली पाडले. या हल्ल्यात अनिल मधे जखमी झाल्याने बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

यावेळी ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात जेरबंद झाला.

पिंजर्यातून धडपड केल्याने पिंजऱ्याचे गज वाकविले त्यामुळे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने दुसरा पिंजरा लावत बिबट्याची ,मादी जेरबंद करण्यात आली. आणि त्याची रवानगी चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात रवानगी करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!