फसवणूक प्रकरणी सोनारावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा, अशा फसव्या योजनेत येथील एका सोनाराने कोकमठाणच्या (ता. कोपरगाव) येथील महिलेची नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगिता पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले आहे,चार वर्षांपूर्वी वैष्णवी अलंकारगृहाने ज्वेल गोल्डी योजनेचे आमिष दाखवून सोने जमा करत एका तोळ्यामागे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देऊ, असे सांगून फसवणूक केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment