राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी शरद पवार नगर मुक्कामी

Published on -

अहमदनगर: नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून शुक्रवारी (दि.२०) ते नगरला मुक्कामी येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवार (दि.१७) पासून शरद पवार दौऱ्यावर निघणार आहेत. सोलापुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची पहिली बैठक होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर व सातारा जिल्ह्यात बैठका घेऊन ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

भाजप-शिवसेनेकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थोपवणे व पक्षात अजूनही असलेल्यांना विश्वास देणे हाच या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे बोलले जात आहे. शक्रवारी (दि.२०) जालना आणि औरंगाबाद येथे बैठका घेऊन ते नगरला मुक्कामा येणार आहेत.

शनिवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता ते नगरमध्ये पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार, पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, नगरसेवक तसेच सहकार क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधणार आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News