कर्जत-जामखेडचा पाणीप्रश्न कायमचा सोडवू : रोहित पवार

Published on -

कर्जत : राज्यात सर्वात विकसित मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेडची वेगळी ओळख निर्माण होईल. या भागातील प्रश्न सोडवायचे आहेत. शिक्षण, रोजगारा बरोबरच सर्वात जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न पुढील काळात कायमचा सोडवला जाईल.

असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. दूरगाव (ता.कर्जत)येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुबारक शेख हे होते. प्रास्ताविकात दूरगावचे मा. सरपंच अशोक जायभाय म्हणाले की, गावागावात लावण्यात आलेल्या विकासाच्या बोर्डावर चुकीचा विकास दाखवण्यात आला आहे.

यावेळी ओंकार निंबाळकर, कांतिलाल लोंढे, डॉ.चंद्रकांत जायभाय, माधुरी लोंढे, नानासाहेब निकत आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. गेली पंधरा वर्षात विकासाची कामे झाली नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही अशा अनेक अडचणींचा पाढा येथील महिला ग्रामस्थांनी पवार यांच्यासमोर वाचला.

या मेळाव्यासाठी सुनिल शेलार, शहाजी निंबाळकर, राहुल नेटके, भारत मोघल, दादा परदेशी, जाकीर सय्यद, दत्ता पोटरे, सुभाष भगत, अजिनाथ जायभाय, सदाशिव निंबाळकर, सुरेश वाबळे, अमोल राजेभोसले, कैलास जायभाय, विजय क्षीरसागर, विष्णू परदेशी, दिपक शिंदे, मोहन गोडसे आदीसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News