अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-देशाच्या स्वतंत्र्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या जीवनाचा बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र मिळवून दिले व स्वतंत्र्यानंतर जसाजसा काळ पुढे जात आहे व येणारी नवीन पिढला स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या विषयी गांभिर्य राहिलेले नाही हे दिसून येते.
अशावेळी स्वतंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करुन वेगवेगळे उपक्रम राबविल्याने या उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांना सामिल करुन घेऊन ते पार पारडणे.
अशा उपक्रमांमुळेच राष्ट्रीय एकात्मतेला खर्या अर्थाने बळ मिळते, असे प्रतिपादन डॉ.रफिक सय्यद यांनी केले. मखदुम सोसायटीच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त
कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अलकरम सोशल अॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्यावतीने अल-करम मॅटरनिटी हॉस्पिटल येथे आनंदऋषीजी नेत्रालय व फिनिक्स फौंडेशनच्या सहकार्याने मोफत रक्तगट,
सर्वरोग निदान तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.रफिक सय्यद, डॉ.रेश्मा चेडे,
डॉ.संतोष चेडे, डॉ.रिवाजन अहेमद शब्बीर, डॉ.परवेझ अशरफी, डॉ.जहीर मुजावर, नईम सरदार, फिनिक्सचे जालिंदर बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुशिल गाडेकर, मिश्रीलाल पटवा यांनी नेत्रतपासणी केली तर राहिल शेख, अमिन शेख यांनी रक्तगट तपासणी केली. प्रास्तविक आबीद दुलेखान यांनी केले .
सूत्रसंचालन सय्यद समीर यांनी केले तर आभार तौसिफ तांबोळी यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी शोएब शेख, इम्रान शेख, शहानवाज तांबोळी, शेरअली शेख, तौसिफ तांबोळी, सय्यद समीर आदिंसह पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved