अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाच्या वर्षी सर्वच सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यातच देशभर प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर मध्ये प्रथमतःच अशी घटना घडली आहे. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनिशिंगणापुर येथील स्वयंभू शनिमंदीर बंद असल्याने गावाच्या इतिहासात प्रथमच आज शनिअमावस्या असतानाही भाविकांची गर्दी पाहायला मिळाली नाही.
शनिवारी अमावस्या आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरत होती.यात्रेला दिवसभरात आठ ते दहा लाख भाविक स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेत होते. कोरोना संसर्गाची काळजी म्हणून विश्वस्त मंडळाने 17 मार्च पासुन दर्शन बंदचा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर शनिजयंती,उदासी महाराज पुण्यतिथी व गुढीपाडवा उत्सव रद्द करण्यात आले होते.
आज शनिअमावस्या व दिवाळी सण असल्याने सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत भाविकांनी तुरळक गर्दी केली होती. मंदीर बंद असतानाही काही पुजा साहित्याच्या दुकाना उघडल्या होत्या.शनिअमावस्या असताना गावात प्रथमच शुकशुकाट पाहण्यास मिळाला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved