अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. यातच दिवालियाच्या दिवशी पोलिसांनी श्रीरामपूर शहरात एक मोठी कारवाई केली आहे.
शहरातील एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ४५० किलो कत्तल केलेले गोवंश जातीचे गोमांस श्रीरामपूर शहर पोलिसांनी शनिवारी पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील वॉर्ड (नं. २), मधील गोल्डन साॅ- मिलच्या पाठीमागे एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती प्रभारी आयपीएस पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांना मिळाली.
त्यांनी स्वतः छापा टाकून सदर ठिकाणाहून सुमारे ६३ हजार रुपये किंमतीचे ४५० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केली. याप्रसंगी कॉन्स्टेबल अमोल वसंत गायकवाड
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम इसाक कुरेशी (रा.वॉर्ड नं.२), रिजवान इस्माईल कुरेशी (रा.वॉर्ड नं.२), फय्याज अयान कुरेशी (रा.वॉर्ड नं. २), यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस नाईक बैसाणे हे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved