पैशाच्या वादातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा ‘राडा’!

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव :- शहरात नुकतेच नव्याने चालू झालेल्या सुदेश टॉकीज जवळील येवले अमृततूल्य चहाचे कोपरगाव शाखेचे संचालक संकेत गौराम मेंगडे (वय १८) यांना नितीन कोपरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप पगारे रा. संजय नगर कोपरगाव व अनोळखी दोन इसमांनी आर्थिक कारणावरून बेदम मारहाण केल्याचा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संकेत गौराम मेंगडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत मेंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

शुक्रवार दि १३ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मी व माझी आई मनीषा गौराम मेंगडे व वडील गौराम मेंगडे असे आम्ही आमच्या दुकानावर असतांना नितीन कोपरे, नगरसेवक संदीप पगारे व अजून अनोळखी दोन इसम आले व त्यानी आम्हाला आर ओ चे पैसे मागून तुम्ही आम्हाला फोन वरून इंग्लिश मधून शिवीगाळ करता काय असे म्हणून शिवीगाळ करू लागले,

त्यावर मी नितीन कोपरे यांना दादा आपण काय असेल ते बोलू असे म्हणालो असता, नितीन कोपरे याच्याबरोबर असलेल्या अनोळखी इसमाने तू कोण आहेस, मला ओळखतो का असे म्हणून माझ्या तोंडात चापट मारली व संदीप पगारे याने आम्हाला तुम्ही ओळखले का?

मी नगरसेवक आहे. याचे १० हजार रुपये देऊन टाका तसेच तुमचे आरोचे मशीन चालो अथवा न चालो असे म्हणत शिवीगाळ करून धमकावले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment