संगमनेर :- मतदार संघात आ. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता शिर्डी विधानसभा मतदार संघात गृहनिर्माण राज्यमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजयरथ रोखण्यासाठी आ. थोरात यांची मुलगी शरयू रणजितसिंह देशमुख यांनी शिर्डीतून उभे रहावे, असा कार्यकर्त्यांचा सूर आल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे.
दरम्यान, शिर्डी विधानसभा मतदार संघातील २८ गावे संगमनेर तालुक्यात असून त्यातील आश्वी व जोर्वे गटात देशमुख यांचे प्राबल्य असल्याने ही लढत धक्कादायक निकाल देणारी ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे. संगमनेर आणि लोणीची भाऊबंदकी राज्यभर सर्वश्रूत आहे.

त्यातून येथील दोन्ही नेते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांना रोखण्यासाठी अनेकदा छुपे प्रयत्न केलेले आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकीपासून विखे – थोरात वाद आणखी चिघळले आहेत.
त्यामुळे आ. थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी लोणीवरून मोठी व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांची सभा घेवून संगमनेरात थोरात विरोधकांना बळ देण्याचा विखेंनी प्रयत्न केला.
तसं पाहिलं तर आ. थोरातांनीही विखेंना धक्का देण्यासाठी शिर्डीवर विशेष लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यांनी अनेकदा शिर्डी, राहात्यात भेटी घेवून कार्यकर्त्यांची मने जाणून घेतली आहे.
- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि सण अग्रीम वाढला
- १ मेपासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल, या नवीन नियमाबाबत जाणून घ्या सविस्तर!
- अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करायचीय? तर ही वेळ आहे सोनेखरेदीसाठी अत्यंत शुभ, जाणून घ्या सविस्तर!
- अहिल्यानगरमधील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, सुनावणी सुरू असतांना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
- अक्षय तृतीयाच्या दिवशीच सोन्याच्या किमतीत मोठा बदल! 30 एप्रिल 2025 ला 10 ग्रॅमचा भाव काय ? महाराष्ट्रात 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत?