MBA , CA झालेल्यांसाठी ‘ह्या’ मोठ्या संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी ; ७५,००० रुपये असेल पगार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- मोठ्या संस्थांपैकी एक असलेली हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकस्ल लिमिटेडने MBA , CA झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आणली आहे.

या ठिकाणी नोकरी लागल्यास पगारही उच्च दर्जाचा असणार आहे. त्यांच्या संस्थेत डायरेक्टरच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे.

शैक्षणिक पात्रता :- या जागेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBA किंवा PGDM उत्तीर्ण असावा लागेल.

चार्टर्ड अकाऊंटंट (CA)च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवारही इथे अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांकडे या क्षेत्रातील १० ते १५ वर्षांचा अनुभव असावा लागेल.

 निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड एचओसीएलची लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

पगार :- सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना ६५,००० ते ७५,००० रुपये प्रति महिना यादरम्यान पगार देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :- योग्य आणि इच्छुक उमेदवार hoclindia.com या एचओसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

या जागेसाठी ऑफलाईन फॉर्म सबमिट करताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ओळखपत्राची कॉपीही उमेदवारांनी सोबत जोडावी.

त्यांना आपला अर्ज ४ जानेवारी २०२१च्या आधी हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकस्ल लिमिटेडचे मुख्यालय, Secretary, Public Selection Board,

Public Enterprises Bhawan, Block no. 14, CGOComplex, Lodho Road, New Delhi- 110003 इथे जमा करावा लागेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment