मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांना बिनव्याजी १० हजार ते १ लाखांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- भारतीय जनता पार्टीच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतानाच

मंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी १० हजार रुपयापासून १ लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यांसदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, मार्च महिन्यापासून मंदिर बंद असल्यामुळे मंदिराच्या आवारातील अनेक छोटया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

या व्यवसायांमध्ये फूल विक्रेते, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा लघु व्यावसायिकांचा समावेश आहे. आता पुन्हा मंदिरे सुरू झाल्यानंतर त्यांना परत त्यांचा व्यवसाय सुरु करायचा आहे.

परंतु त्यांना व्यवसायासाठी भांडवलाची चणचण भासत आहे. त्यामुळे सरकारने छोट्या व्यावसायिकांना तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. सदर कर्जाची परतफेड छोटे व्यावसायिक नियमितपणे करतील.

शासनाने याकरिता बॅकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना द्याव्यात व व्याजाची रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment