अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-मोहटा देवीचे मंदिर पाडव्याला उघडणार असून मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
सोमवारी पहाटे दर्शनबारीतील पहिल्या भाविकाच्या हस्ते महापूजा होऊन त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले जाईल. सवाष्णी जेवू घालणे, भंडारा, महाप्रसाद, भक्तनिवास, सामूहिक भोजन, मंदिर परिसरात पारायण सप्ताह आदींना अजूनही बंदी आहे. गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच आजारी भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे.
सामाजिक अंतर राखत भाविकांनी दर्शन घ्यायचे आहे. आरतीनंतर रात्री आठ वाजता मंदिर बंद होईल. देवस्थान समितीतर्फे सकाळ-सायंकाळ भाविकांना देण्यात येणारा महाप्रसाद पुढील निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
सर्व प्रकारची खबरदारी घेऊन भाविकांचे थर्मल स्कॅनिंग करून मंदिरात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मोहटा देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved