अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशात कांदा चर्चेचा विषय, पण मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदाच आमची लक्ष्मी. यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे, असे सांगत स्वतः पिकविलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी पूजा केली आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना कांदारोपे मिळणेही दुर्लभ झाले. त्यामुळे यंदा डोंगरगण (ता. नगर) येथील शेतकऱ्याने कांदापिकाचेच पूजन केले.
त्याचे फोटो सोशल मीडियावर “व्हायरल’ झाले असून, त्याची मोठी चर्चा आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. सणाच्या मुख्य दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते.
अनेक जण नवनवीन वस्तूखरेदी करतात. यंदा पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या; पण काही केल्या पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता.
आनंदात आणि उत्साहात साजरी होणारी दिवाळी यंदाच्या वर्षी काहीशी निरुत्साही झाली कारण यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचा कांद्याचे पीक नसून गेले. दरम्यान या मोठ्या संकटातून बचावलेल्या कांद्याचे काही शेतकऱ्यांकडून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मनोभावे पूजन केले.
या पूजनाचे छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दिवाळीला कांदापूजन करण्याचा हा प्रकार अनोखा आहे. जिल्ह्यात यापूर्वी शेतकऱ्यांकडून शेती औजारांचे पूजन करीत. मात्र, यंदा प्रथमच एखाद्या पिकाचे पूजन करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved