भोपाळ: मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने एकाच दुकानातून गाईचे दूध व कडकनाथ कोंबड्याचे मांस व अंडी विकण्याची योजना सुरू केली आहे.
सरकारी पार्लरमधून मिळणारे चिकन व गाईचे दूध यांच्या शुद्धतेची १०० टक्के हमी आहे, असा सरकारचा दावा आहे. सरकारच्या वतीने पहिले दुकान भोपाळमधील नेहरूनगर भागात सुरू करण्यात आले आहे. परंतु या योजनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार रामेश्वर शर्मा यांनी म्हटले, हिंदू धर्मात गाय व तिचे दूध पवित्र मानले जाते. याचा उपवासासाठी तसेच अनेक सणात वापर करण्यात येतो.
जो माणूस चिकन विकतो तोच गाईचे दूध कसे विकू शकतो? यामुळे दोन्ही दुकाने वेगळी करावीत, दोन्ही दुकानाचे मालक वेगळे असावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पशुपालनमंत्री लाखनसिंह यादव यांनी म्हटले, भाजपचे आरोप निराधार आहेत.
चिकन पार्लर व मिल्क पार्लरदरम्यान पार्टीशन आहे. एका भागात कडकनाथचे मांस व दुसऱ्यामध्ये गाईचे दूध विकतात.
- प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट
- कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..