अन्यथा पी. चिदंबरम यांच्यासारखी तुमचीही अवस्था होईल

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर देशात सुपर इमर्जन्सीसारखी स्थिती लादल्याचा आरोप केला आहे.

त्यावर भाजपने पलटवार करताना म्हटले की, सुपर इमर्जन्सी तर पश्चिम बंगालमध्ये आहे. तेथे ‘जय श्रीराम’ ही घोषणा दिल्यानंतर तुरुंगात डांबले जाते. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बलिया येथील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना धमकीच दिली.

सिंह म्हणाले की, ममतांनी आपली भाषा बदलावी, अन्यथा त्यांची स्थितीही काँग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासारखीच होईल. आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी भारतीय आहेत, त्यामुळे त्या येथे राहू शकतात.

पण त्यांनी देशविरोधी भाषा केली तर त्यांना पी. चिदंबरम यांच्यासारखाच धडा शिकवला जाऊ शकतो.’ आपल्या विधानसभा मतदारसंघातील बैरिया येथे शनिवारी दोन दिवसांच्या कृषी मेळ्याचे उद्घाटन केल्यानंतर सिंह म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना बांगलादेशी घुसखोरांना वाचवून राजकारण करायचे असेल तर त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान व्हावे. ममता यांना विदेशी शक्तींचा पाठिंबा मिळत आहे असे वाटते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment