गोमांसची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले; तिघेजण ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे देशभर सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. दरदिवशी अवैध धंदे वाढू लागल्याने पोलिसांकडून सातत्याने धाडसत्र सुरु केले आहे.

नुकतीच एका खासगी कारमधून विक्रीसाठी चालवलेले ३५०किलो गोमांस आज पाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव चौकात गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पकडले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारमधील तिघांना ताब्यात घेतले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, आज पहाटे सहायक पो नि सानप,पोलीस कर्मचारी आणि काही पोलीस मित्र हे शहरात गस्त घालत होते.

त्यावेळी ते पेडगाव चौकात आले असता जामखेड कडून दौंडकडे जाणारी एक होंडा सिटी कार पोलिसांना दिसली. संशय आल्यामुळे ती कार पोलिसांनी थांबवून कारची बारकाईने तपासणी केली असता

कारच्या डिकीमध्ये दौंड येथे विक्रीसाठी चालवलेले जवळपास ३५०किलो वजनाचे गोमांस पोलिसांना मिळाले. त्यानंतर या कारसह तिघेजण ताब्यात घेतले असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment