थेट नगर-पुणे रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न – खा.डॉ सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

‘दौंड रेल्वे स्थानकाला बायपास करणारी नगर-पुणे रेल्वे लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय औद्योगिक विकासासाठी दळणवळण सुविधांचा विस्तार व आधुनिकीकरण गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने नगर जिल्ह्याला पुणे व औरंगाबाद या दोन्ही महानगरांशी रेल्वेद्वारे जोडले जाणे आवश्यक असून त्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहोत’, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू आहे. तसेच थेट नगर-पुणे रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करीन’, असेही विखे म्हणाले.

नगरच्या रेल्वे स्थानकामध्ये स्वयंचलित सरकत्या जिन्याचे (एस्केलेटर) उद्घाटन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, माजी खासदार दिलीप गांधी,

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा, अनिल शिंदे, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, रेल्वेच्या स्थापत्य विभागाचे ए. एल. पंचाल, वाणिज्य आधिकारी राज मीना, स्थानक व्यवस्थापक नरेंद्रसिंह तोमर, अजय चौबे यांच्यासह रेल्वेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment