बहिणींच्या भेटीसाठी जयंत पाटील पोहचले नगरला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण साजरा होतो आहे, यातच आज भाऊबीज आहे. यादिवशी बहिणी भावला ओवाळत असते. अशीच एक अनोखे भाऊबीज नगरमध्ये घडली, ज्याची चर्चा शहरात सुरु होती.

बहिणींना भेटण्यासाठी भाऊबिजेनिमित्त बहुतेक ठिकाणी बहिणी भावाकडे जात असल्या, तरी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आपल्या बहिणींना भेटण्यासाठी दरवर्षी नगर जिल्ह्यात येतात.

पाटील हे नगर दौऱ्यावर आले व नगर येथील नीलिमा नरेंद्र घुले तसेच राहुरी इथे उषा प्रसाद तनपुरे या दोन्ही बहिणींच्या घरी त्यांनी धावती भेट दिली. यावेळी बहिणींनी पण मंत्री असलेल्या आपल्या भाऊरायाला प्रेमळपणे ओवाळून औक्षण केले.

जयंत पाटलांच्या दोन बहिणी नगर जिल्ह्यात लग्न होऊन आल्या आहेत. मोठी बहीण उषा या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री आहेत.

तसेच धाकटी बहीण नीलिमा या शेवंगावचे माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी आहेत. नगर जिल्ह्यात तनपुरे-घुले हे मोठे राजकीय वजन असलेले प्रस्थ आहे. जयंत पाटील दरवर्षी न चुकता भाऊबीजेला नगर जिल्ह्यात येत दोन्ही बहिणींच्या घरी भाऊबीज ओवाळणी साठी येत असतात.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment