नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्याने शेतातील पीक वाया गेले आहे.

त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपच्या सह्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
- अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन अहवाल केला सादर
- सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! पुण्यासाठी सुरु झालीये Vande Bharat Train, कसं आहे वेळापत्रक?
- अहिल्यानगरमध्ये १०० हून जास्त कत्तलखाने! घरातून होम डिलिव्हरीद्वारे गोमांस विक्री, दुसऱ्या मजल्यावरही सुरू आहेत कत्तलखाने
- 12 वर्षानंतर गुरु ग्रहाचे कर्क राशीत आगमन! ‘या’ राशीच्या लोकांना येणार सुखाचे दिवस, मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण
- राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या राजकीय वादात करोडोच्या उद्यान प्रकल्पाची झाली दुर्दशा; झाडे जळाली, कोनशिलाही गायब