अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा निषेध करत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते.
दरम्यान पुन्हा एकदा संतप्त शेतकऱ्यांनी आपली मंजूर झालेली थकीत रक्कम तातडीने व्याजासह अदा करावी यासाठी काल उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांना घेराव घालुन निवेदन दिले. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने ना. तनपुरे हे तालुक्यातील टाकळीभान येथील एका खाजगी कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी उपस्थित राहणार असल्याचे
समजताच शेतकऱ्यांनी त्यांना कार्यक्रमस्थळीच गाठले. यावेळी शेतकऱ्यांनी ना.तनपुरे यांना आंदोलनात ठरल्याप्रमाणे बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना ना.तनपुरे म्हणाले की,ऊस बिलाच्या थकबाकीबाबत मला कल्पना नव्हती.
शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मी माहिती घेतली व व्यवस्थापन सोबत बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांचे फरकाची उसबिले देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी संजीव उंडे,
अशोक कारखान्याचे माजी संचालक साहेबराव पटारे व मारुतीराव पटारे,आप्पासाहेब पटारे, बबन शिवरकर,सुभाष शिवरकर, ज्ञानदेव उंडे,निवृत्ती उंडे, नानासाहेब गोरे,गोरक्षनाथ गोरे,चित्तरंजन गोरे, नवनाथ उंडे आदी शेतकरी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved