मान्सूनच्या वेळापत्रकात बदल?

Published on -

दिल्ली : हवामानाचे देशातील बदलते स्वरूप पाहून सरकारने मान्सून सक्रिय होण्याच्या (१ जून) व तो परत जाण्याच्या (१ सप्टेंबर) तारखांत बदल करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे.

नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याच्या व ते परत जाण्याच्या तारखांची समिक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने यासंबंधी सकारात्मक शिफारस केल्यास पुढील वर्षापासून मान्सूनच्या वेळापत्रकांत योग्य तो बदल केला जाईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

‘स्वातंत्र्यानंतर १९५० च्या दशकात हवामान विभागाने देशात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याची तारीख १ जून व ते परतण्याची तारीख १ सप्टेंबर निश्चित केली होती. दर १० वर्षांनी या पूर्वनियोजित तारखांचा फेरआढावा घेतला जातो.

पण, अद्याप त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही’, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe