पारेनर :- विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून पारनेर तालुक्यात लवकर राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
सेनेतून हकालपट्टी झालेले निलेश लंके माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे.
सुपा येथील सफलता लॉन्समध्ये सोमवारी निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गट प्रमुख, गण प्रमुख, शाखा प्रमुखांची गोपणीय बैठक झाली.
या बैठकीत निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. या बैठकीची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
अद्याप ठाम निर्णय नाही…..
या बैठकीच्या नियोजनाबाबत प्रतिष्ठाणच्या एका पदाधिकाऱ्याला विचारले असता तो म्हणाला, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लंके यांनी अपक्ष निवडणूक का एखाद्या पक्षात प्रवेश करुन लढवायची याबाबत चर्चा करण्यात आली.
मात्र, याबाबत ठाम निर्णय झाला नसून मुंबई येथे स्थायिक असलेले निलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय होणार असल्याचे प्रतिष्ठाणकडून सांगण्यात आले.
आमदार विजय औटी यांच्यासमोरील अडचणी वाढल्या…
लंके यांनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून पारनेर विधानसभा मतदार संघात गावोगावी शाखा उघडून मोठे संघटन एकत्र केले आहे.
24 तास 335 दिवस लोकांसाठी वेळ देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.लंके यांच्या राजकीय खेळीमुळे आमदार विजय औटी यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.