नवी दिल्ली : फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे पत्र कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (काईट) या व्यापारी संघटनेने केंद्राला दिले आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांना काईटने पत्र पाठवून यासंदर्भातील मागणी केली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रचंड सूट थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणाचे उल्लंघन करणारी आहे.

या कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेल प्रकरणात अथवा प्रचंड मोठ्या प्रमाणात सूट देणाऱ्या इतर कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये आपण तातडीने लक्ष घालावे. वस्तू अथवा सेवा यांच्या विक्री किमतीवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना बंदी आहे. तरीही या कंपन्या भरमसाठ सूट देऊन किमतींवर परिणाम करीत आहेत.
हा उघड उघड नियमभंग आहे. सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या सवलतीत मोठी वाढ करत आहेत. त्यामुळे त्यांच्या फेस्टिव्हल सेलवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे काईटने आपल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रात फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या कंपन्यांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे.
- Ahilyanagar News : कॉफीच्या टेबलवर नव्हे, बेडरूमसारखी सीन ! अहिल्यानगर पोलिसांचा मोठा खुलासा
- पुण्याला 5,262 कोटी रुपयांचा नवा मार्ग मिळणार ! आता ‘या’ भागात विकसित होणार नवा उन्नत मार्ग, कसा असणार रूट ? पहा….
- फक्त 15 दिवस थांबा, वाईट काळ संपणार ! 16 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, अचानक धनलाभ होण्याची शक्यता
- बोगस कर्जमाफी प्रकरण भोवणार! राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रिपद जाणार? संजय राऊत आणि निलेश लंके आक्रमक
- Pune Ring Road: पुणे रिंग रोडसाठी आणखी जमिनीची गरज! ‘या’ 32 गावातील जमीन रिंग रोडसाठी संपादित होणार… संपूर्ण यादी वाचा