अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- राज्यात ऐन थंडीच्या काळात सरासरी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १९ ते २१ नोव्हेंबर या काळात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात बुधवारी नाशिक येथे सर्वात कमी १७.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १९ ते २१ नोव्हेंबर या काळात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved