अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहारमध्ये राहणाऱ्या रमेश पाटीलबा थोरात यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली.
ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. थोरात हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून मणिमंगळसूत्र व रोख रक्कम लांबवली.
थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, दिवाळीच्या सुटीत परगावी गेलेल्या अनेकांच्या घरात
लहान-मोठ्या चोरीच्या घटना जिल्हाभरात झाल्या आहेत. काहीजण अजून घरी परत आले नसल्याने नेमक्या कुठे कुठे चोऱ्या झाला, याचा संपूर्ण तपशील उपलब्ध झालेला नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved