ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले. माझ्यासाठी शिवसेनाप्रमुख विठ्ठलच होते.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या साहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिवसैनिकांनी कामाला सुरुवात केली. हे करत असताना प्रस्थापितांकडून मोठा विरोध झाला, तरी काम सुरू होते.

साहेबांच्या आशीर्वादाने २००१ मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी मला मिळाली आणि कोपरगावात ३५ वर्षांनंतर सत्तापालट होऊन जनतेतून प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

यावेळी कैलास जाधव, अस्लम शेख, कलविंदरसिंग दडियाल, भरत मोरे, सरपंच संजय गुरसळ, मुकुंद सिनगर, बाळासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment