अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-माझे लाईट बील माझी जबाबदारी, माझे शिक्षण माझी जबाबदारी. माझे आरोग्य माझी जबाबदारी… मग तुमची जबाबदारी काय? आघाडी का, बिघाडी…..सर्व जबाबदाऱ्या जनतेनेच पार पाडायच्या तर मग हे शासन नेमकी काणती जबाबदारी पार पाडणार आहे.
असा प्रश्न आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी उपस्थीत करत, शिवसेनेने केवळ मते मिळवण्यासाठीच वीजबील कपातीची घोषणा करून तसा वचननामा प्रसिद्ध केला. मात्र त्याची पूर्तत करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
असा आरोप करत आम आदमी पक्षाच्यावतीने पाथर्डीत शिवसेनेच्या वचननाम्याची होळी केली. शिवसेनेने राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत वीजबील कपातीची घोषणा करून तसा वचननामा प्रसिद्ध केला. मात्र याची पूर्तता या महाविकास आघाडी सरकार कडून करण्यात आली नाही.
उलट लॉकडाऊन मधील वाढीव बिले आहेत. त्या रक्कमेची भरण्याच्या निर्णय घेऊन सर्व सामान्य गोरगरीब शेतकरी यांची फसवणूक केली आहे.
फक्त मतासाठीचा शिवसेनेचा वचननामा होता असे या निर्णयाने सिद्ध झाल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष किसन आव्हाड यांनी केले. शुक्रवारी पाथर्डी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आम आदमी पार्टी अहमदनगर जिल्हयाच्या वतीने शिवसेनेने निवडणुकीत वीज बिलाबाबत कपात करू
असा वचननामा काढला होता. त्याची प्रतिकात्मक पत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी बोलताना यावेळी आव्हाड म्हणाले, शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री पदावर असलेले उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक मध्ये शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला होता. शिवसेनेची दहा वचने जनतेला दिली होती.
त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे प्रामुख्याने वीज दर कपात त्यामध्ये ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्याने कमी करणार असे घोषित केले होते. एक वर्षे उलटून देखील या महाराष्ट्र सरकारने कुठलीही वीज दर कपात अथवा वीज बिल माफी केली नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved