पारनेर : विधानसभा उपसभापती यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या लंकेनीं भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप केला.
विजय औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार आहेत. विजय औटी हे कमिशन मागत असल्याची व्हिडिओ क्लिप वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार अशी प्रतिक्रियाही निलेश लंके यांनी दिली आहे.
पारनेर मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचे संकेत देखील राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत देताच निलेश लंके यांनी विजय औटी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
- पृथ्वीचा विनाश सुरू? भारतात स्थिती गंभीर! हवामान बदलामुळे देशात 3.2 कोटी लोक बेघर, पुढील काळात…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार ? वाचा..
- अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या एसपी सोमनाथ घार्गे यांनी केल्या बदल्या
- जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांची थेट सेवा समाप्ती होणार
- अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचा अजब कारभार, तपासणी न करताच शिक्षेकेच्या नावानं दिलं ‘अनफिट’ असल्याचे प्रमाणपत्र